पातूर प्रतिनिधी : पातूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरीत्या गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई करत एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तीन गोवंश जनावरे आणि बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ₹ ६.७० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून बोलेरो पिकअप (क्र. MH-30-AB-2891) ची तपासणी करण्यात आली. त्यावेळी वाहनामध्ये तीन गोवंश जनावरे क्रूरतेने कोंबून अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.यानंतर पोलिसांनी वाहनासह जनावरे ताब्यात घेत कारवाई केली.या प्रकरणी शेख फय्याज शेख हय्यात (वय ३० राहणार मुजावरपुरा,ता.पातूर.जि. अकोला) तसेच वाहन मालक शेख वाजीद शेख राजिक (रा.मुजावरपुरा ता.पातूर.जि. अकोला) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२५ तसेच प्राणी संरक्षण अधिनियम १९६० मधील कलम ५,५अ,५ ब, ९ व ११(१)(ल) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत अंदाजे ₹ ६ लाख किमतीचे बोलेरो वाहन आणि ₹ ७० हजार किमतीची तीन गोवंश जनावरे असा एकूण ₹ ६ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक लेव्हलकर तसेच पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मेश्राम,पातुर पोलीस उपनिरीक्षक गोसावी,सह पोलीस कॉन्स्टेबल सांगळे (६०१),रोशन (२४१४), साई (२२७६) व नितीन (१३१३) यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.






