पातूर (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जनसेवा सप्ताहा’ चा शिर्ली

येथे उत्साहात समारोप झाला.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २५ मान्यवरांचा तसेच इयत्ता १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा अकोला महानगरपालिकेचे माजी महापौर मदनजी भरगड होते.

प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती मेघाताई देशमुख, श्रीमती रेखाताई बिडकर,पांडुरंग अर्वट,मेहबूब खान,विनोद भुटे,प्रा.विजयरत्न उगवणे,डॉ.अशोकराव मेतकर,किशोरराव झुके,रामकुमार अमानकर,हेमलता अंधारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला जिल्हा (ग्रामीण) माजी जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे म्हणाले, “अजितदादांसारखे नेतृत्व पुन्हा होणे नाही.त्यांनी सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून राज्याची सेवा केली असून अकरा वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.विकासाभिमुख दृष्टीकोन,प्रशासकीय कार्यक्षमता आणि सर्वसामान्य जनतेसाठी दिवसाचे १८ ते १८ तास काम करण्याची त्यांची कार्यशैली प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी आहे.”अध्यक्षीय भाषणात मदनजी भरगुड यांनी जनसेवा सप्ताहानिमित्त राबविण्यात आलेल्या सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी कृष्णा अंधारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेश पाटील ताले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गजानन पाटील, प्रतीक ताले, गोपाल वाकरे, गोपाल देवके, पुरुषोत्तम महल्ले, शुभम झुके, ज्ञानेश्वर ताले, अरुण पन्हरे, मुस्ताक बेग, विजय पाटील, सहदेवराव लांडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.







