पातूर प्रतिनिधी : चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सुमारे ४० ते ४५ गावांमध्ये वरली-मटका व्यवसाय पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. केने ,कर ! नामक व्यक्तीच्या माध्यमातून हा प्रकार सुरू होण्याचे संकेत मिळत असल्याची माहिती स्थानिक पातळीवर चर्चेत आहे. या चर्चेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, पोलिस प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागात वरली-मटका आणि तत्सम अवैध जुगाराचे प्रकार वाढल्यास अनेक कुटुंबांवर त्याचा आर्थिक परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित गावांमध्ये अशा प्रकारच्या हालचाली सुरू आहेत का, याची पोलिसांनी गोपनीय पद्धतीने पडताळणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या परिसरात अवैध जुगाराचा प्रकार सुरू होण्याची चर्चा होत असताना स्थानिक पोलिस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, केने ; कर ! नामक व्यक्तीचा या कथित प्रकाराशी नेमका संबंध आहे का, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी या चर्चेची सत्यता तपासून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे.
आता चान्नी पोलिस या चर्चेची दखल घेऊन चौकशी करतात का आणि वरली-मटका सुरू होण्यापूर्वीच त्यावर आळा घालतात का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.







