ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण; पोलीस व होमगार्ड सैनिकांची उपस्थिती
पातूर प्रतिनिधी : भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट रोजी पातूर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

सकाळी ठीक ७ वाजता आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात पातूर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आलीयावेळी राष्ट्रगीत, वंदे मातरम्, ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ तसेच राज्यगीताचे गायन करून राष्ट्रध्वजाला सन्मान देण्यात आला.संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला होता.या कार्यक्रमास पातूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक खंडारे, उपनिरीक्षक गोसावी, उपनिरीक्षक वानखडे, पोलीस अमलदार तसेच पोलीस कर्मचारी,महिला पोलीस, सह पातूर तालुका होमगार्डचे प्रभारी समादेशक अधिकारी सुधाकर कराळे,

माजी प्रभारी समादेशक अधिकारी संगीता इंगळे यांच्यासह पातूर पथकातील महिला व पुरुष होमगार्ड सैनिक उपस्थित होते.यावेळी ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच होमगार्ड सैनिकांना ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. देशाच्या सुरक्षेसाठी व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस व होमगार्ड दल बजावत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे त्यांनी कौतुक केले.

तसेच १४ ऑगस्ट रोजी पातूर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हेल्मेट रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतलेल्या सर्वांचे ठाणेदार जाधव यांनी अभिनंदन केले. नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. देशभक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे पातूर पोलीस स्टेशन परिसरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह दिसून आला.







