पातूर : देशभरात आज, १५ ऑगस्ट रोजी ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना पातूर येथील महिला आर्थिक विकास महामंडळ, अकोला अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र,पातूर तसेच नवतेजस्विनी रेडीमेड गारमेंट निर्मिती व प्रशिक्षण केंद्र,पातूर या कार्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे.उपलब्ध छायाचित्रात संबंधित कार्यालयाचे शटर बंद असल्याचे दिसून येत असून, स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यालय परिसरात ध्वजारोहणाची कोणतीही व्यवस्था दिसत नाही. त्यामुळे शासकीय योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या या केंद्रात राष्ट्रीय सणाच्या दिवशी ध्वजारोहण का करण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.संबंधित कार्यालयाने या दिवशी ध्वजारोहण केले होते का? केले असल्यास ते कुठे आणि कोणाच्या उपस्थितीत झाले, याबाबत संबंधित विभागाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







