पातूर शहरात रिलायन्स जिओची इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.गेल्या काही तासांपासून नेटवर्क व्यवस्थित कार्यरत नसल्यामुळे ऑनलाइन कामे,व्यवहार आणि दैनंदिन संवाद ठप्प झाला आहे.ग्राहकांच्या म्हणण्यानुसार,इंटरनेट स्पीड अत्यंत मंदावला असून अनेक ठिकाणी नेटवर्क पूर्णपणे बंद पडले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण,व्यापाऱ्यांचे व्यवहार तसेच सामान्य नागरिकांचे महत्त्वाचे कामे रखडली आहेत.या ढिसाळ सेवेमुळे ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.“दर महिन्याला रिचार्ज करूनही योग्य सेवा मिळत नाही,” अशी प्रतिक्रिया काही ग्राहकांनी दिली.अचानक सेवा खंडित होण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.नागरिकांनी लवकरात लवकर सेवा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.दरम्यान,वारंवार होणाऱ्या अशा समस्यांमुळे जिओ कंपनीने आपल्या सेवेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.







