पातूर तालुक्यातील मौजे सुकळी येथे प्रतिष्ठित नागरिक स्वर्गीय राजाराम वांडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय आमदार तथा शिवसेना उपनेते मा. श्री. नितीन बाप्पू देशमुख यांनी दौऱ्यादरम्यान त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन परिवाराची सांत्वना केली.
यावेळी आमदार देशमुख यांनी वांडे परिवाराच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला व स्वर्गीय राजाराम वांडे यांच्या कार्याची आठवण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य गोपाल ढोरे, पोलिस पाटील दादाराव वांडे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







