पातूर तालुका प्रतिनिधी
देशभरात विविध वस्तूंवर छापण्यात येणाऱ्या कमाल किरकोळ किंमत (MRP) धोरणाच्या नावाखाली ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय ग्राहक पंचायत,पातूर तालुका शाखेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे.या निवेदनाची प्रत तहसीलदार,पातूर यांनाही देण्यात आली.यावेळी पातुरते तहसीलदार डॉक्टर राहुल वानखडे यांनी निवेदन स्वीकारले1 जून 2026 रोजीअखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष देवानंद गहिले,यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,अनेक उत्पादक कंपन्या वस्तूंवर अवास्तव व फुगवलेले MRP छापत असून ग्राहकांना मोठ्या सवलतीचे आमिष दाखवून वस्तू विकल्या जात आहेत.प्रत्यक्षात वस्तूंची मूळ किंमत कृत्रिमरित्या वाढवलेली असल्याने ग्राहकांची दिशाभूल होत आहे.ग्राहक पंचायतच्या म्हणण्यानुसार,अशा प्रकारच्या व्यवहारामुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असून बाजार व्यवस्थेवरील विश्वासही कमी होत आहे.या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ग्राहक पंचायतने देशभर जनजागृती मोहीम सुरू केली असून दिल्ली येथेही आंदोलन सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.प्रमुख मागण्याग्राहकांच्या हितासाठी शासनाने तातडीने पुढील उपाययोजना कराव्यात,अशी मागणी करण्यात आली आहे वस्तूंवर छापण्यात येणाऱ्या अवास्तव व दिशाभूल करणाऱ्या MRP वर नियंत्रण आणावे.उत्पादक कंपन्यांनी उत्पादन खर्च, नफा आणि कर यांची पारदर्शक माहिती सार्वजनिक करावी.ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत फसव्या MRP विरोधात कठोर दंडात्मक कारवाई करावी.ऑनलाइन व ऑफलाइन विक्रीतील किंमतींमध्ये एकसमान किंमत धोरण लागू करावे.ग्राहक जनजागृतीसाठी शासनाने व्यापक मोहीम राबवावी.निवेदनात पुढे म्हटले आहे की,वाढती महागाई आणि सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक ताण लक्षात घेता MRPच्या नावाखाली सुरू असलेली लूट थांबविणे अत्यंत आवश्यक आहे.ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने तात्काळ योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी ग्राहक पंचायतने केली आहे.या निवेदनावर तालुकाध्यक्ष देवानंद गहिले,महिला अध्यक्षा प्रा.करुणा गवई,सचिव संदीप गिऱ्हे, प्रा.प्रशांत निकम,नारायण रावजी अंधारे,श्रीमती भारतीताई गाडगे,सौ सुप्रियाताई इंगळे, रामदास मोकळकर यांच्या सह इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.ग्राहकांच्या प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन ठोस निर्णय घ्यावा,अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.






