बाळापूर-पातूर विधानसभा मतदार संघाचे आमदार नितीनजी देशमुख एक संघर्षशिल व्यक्तिमत्त्व होय. सदैव सामान्य माणसाच्या गराड्यात राहणाऱ्या या माणसाने मतदारसंघालाच आपले कुटुंब मानल्याचे दिसून पडते.सुखदुःखात गरीब माणसापर्यंत धावून जाणारा हा माणूस महाराष्ट्रातील मोजक्याच आमदारांपैकी एक आहे एव्हढे मात्र निश्चित. करोडो रुपयांची विकासकामे मतदार संघात पुर्ण झाली आहेत.विकासाचा झंझावात ज्याला म्हणतात तो असा!सगळ्या जाती धर्माला सोबत घेवून चालणाऱ्या या माणसाने विकास व स्नेहाचा अभूतपूर्व इतिहास रचला आहे याला तोड नाही. जिल्हाभरात पदयात्रा काढुन अनेक मैल व कोस चालून विकासाच्या संधी शोधत चालला आहे. प्रवासात सामान्य लोकांबरोबर पंगतीत बसुन मिळेल ते साधे मिठ भाकरीचा आहार घेवून ६००-७०० की मी पायी चालत लोकांची दुःखे ऐकणे ही साधी गोष्ट थोडीच आहे. आज एसी गाड्यातून प्रवास करणारे लोकप्रतिनिधी पाहिले की, हा पायी प्रवास चमत्कार वाटावा.ध्येयवेडा नितीनजी देशमुख ह्या माणसाने मतदारसंघातील प्रत्येक ठिकाणी विकासाची कोनशीला व कळस उभा केला आहे,हे विसरता येणार नाही.सदैव माणसाच्या गराड्यात राहणाऱ्या या माणसाने आपल्याला वैयक्तिक जीवन आहे हे सुद्धा विसरला आहे. संपूर्ण जीवन सामाजिक कार्याला अर्पण करण्याचा ध्यास घेतला आहे. अनेक संकटे आली पण लोकसेवेच्या कार्यात खंड पडू दिला नाही. साध्या माणसाचा केंव्हाही फोन जरी आला तरी रिसिव्ह करून तात्काळ आवश्यक ती मदत करण्यास कटिबद्ध असलेला हा माणूस सगळ्यांना आपला हक्काचा माणूस वाटत आला आहे,तुम्ही फक्त हाक द्या!नितीनजी देशमुख तुम्हाला “ओ” दिल्याशिवाय राहत नाही.एवढी बांधीलकी व तत्परता खचितच दुसऱ्याकडे असेल!हीच त्यांची अभेद्य शक्ती आहे. वास्तविकता मी त्यांचा कार्यकर्ता वा पक्षाचा सदस्यही नाही.सार्वजनिक जीवनात वावरत असतांना ज्या गोष्टी ऐकण्यात व पाहण्यात आल्या त्या बिनधास्तपणे मांडल्या गेल्या पाहिजेत. एक लेखक व साहित्यिक म्हणून माझ्या नजरेने टिपलेल्या गोष्टी मी शब्दबद्ध केल्या आहेत. कामाची प्रचंड ऊर्जा असलेला हा माणूस उद्याच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात”कॅबिनेट मंत्री”म्हणून पातूर-बाळापूर तालुक्याला ऐतिहासिक सन्मान मिळवून देईल याबाबत मला तरी शंका वाटत नाही.याचे उत्तर काळाच्या उदरात दडलेले आहे.१९५२ पासून झालेल्या निवडणुकीवर नजर टाकली तर मंत्रिपदाचा मुकुट बाळापूर-पातूर मतदार संघाच्या शिरपेचात मानाचा मुकुट विराजमान झाला नाही. आपला माणूस नितीनजी देशमुख यांना हा सन्मान खुणावत आहे. झुंज एका आमदाराची साकार होण्यासाठी प्रत्येक माणसाचा स्वाभिमान उचंबळून यावा!दृष्टीपथातील सन्मान अधिक सुस्पष्ट व्हावा.आमदार नितीनजी देशमुख यांचा प्रवास प.स. सदस्य, उपसभापती, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती ते विधानमंडळ सदस्य हा अनेक साहस व कर्तृत्वाने तसाच आव्हानांनी भरलेला आहे,तरीही हा योद्धा निर्भयपणे असंख्य सवंगडी सोबत घेवून व अनेकांच्या आशिर्वादाने विकासाची वाट बांधत चालला आहे.
सॅल्युट!!
शुभास्ते पंथान…
प्राचार्य जयसिंग द जाधव






