पातूर प्रतिनिधी : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारू,मटका-जुगार आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांनी पुन्हा डोके वर काढल्याची चर्चा असून,गावठी दारूच्या व्यवसायाबाबत गंभीर आरोप होत आहेत.विशेषतः गावठी दारूमध्ये आरोग्यास घातक व विषारी द्रवाचा वापर केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून,या प्रकाराची तातडीने तपासणी करण्याची मागणी होत आहे.आलेगावसह, मळसुर ,चान्नी,पिंपळखुटा,अंधार सांगवी, सस्ती,विवरा,चरणगाव,खेट्री, चतारी,तुलंगा बु. तुलंगा खुर्द , येथे वरली मटका, व गावठी दारूची खुलेआम विक्री होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.या दारूमुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक व सामाजिक परिणाम होत असून,तरुण पिढीही व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. ‘विषारी द्रव’ वापराच्या आरोपाने खळबळ गावठी दारू तयार करताना नियमबाह्य आणि आरोग्यास अपायकारक पदार्थांचा वापर केला जात असल्याचे आरोप पुढे येत आहेत.दारूमध्ये नेमका कोणता द्रव वापरला जातो, त्याचे नमुने तपासले जातात का, तसेच या दारूमुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण होत आहे का,याची प्रशासनाने प्रयोगशाळा तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी,अशी मागणी होत आहे.आलेगाव ‘व मळसुर अवैध व्यवसायांचे अड्डा बनतेय ? गावठी दारूसोबतच मटका-जुगार,हातभट्टी आणि अन्य बेकायदेशीर व्यवसायांना परिसरात ऊत आल्याची नागरिकांची तक्रार आहे.पोलिसांकडून अधूनमधून कारवाई होते.मात्र काही दिवसांतच संबंधित व्यवसाय पुन्हा सुरू होत असल्याचा आरोप केला जात आहे.कारवाईनंतरही अवैध धंदे सुरू राहत असतील तर नेमके कोणाच्या आशीर्वादाने हे व्यवसाय सुरू आहेत? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.







